बाप – मुलाच्या धमाल नात्याची झलक ‘आवशीचो घो’मध्ये!

‘दशावतार’मधील पहिलं गाणं प्रदर्शित सध्या सर्वत्र चर्चेत असलेला आणि प्रेक्षकांच्या प्रचंड उत्सुकतेचा विषय ठरलेला ‘दशावतार’ हा मराठी चित्रपट लवकरच म्हणजेच १२ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. झी स्टुडिओज प्रस्तुत, ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊस निर्मित या भव्य चित्रपटात अनेक दिग्गज कलाकारांची मांदियाळी आहे. दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, विजय केंकरे, सुनील तावडे, रवी … Read more

‘टँगो मल्हार’ या चित्रपटातून उलगडणार एका रिक्षा चालकाचा प्रेरणादायी प्रवास

चित्रपट या माध्यमाची जादू काही औरच आहे. कोणत्याही क्षेत्रात काम केलं, तरी स्वतः चित्रपट करण्याची उर्मी काहींना स्वस्थ बसू देत नाही. संगणक शास्त्रज्ञ तसेच उद्योजिका असलेल्या साया दाते यांनी आगामी ‘टँगो मल्हार’ या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केले आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आले असून येत्या १९ सप्टेंबरला हा चित्रपट संपूर्ण … Read more

दोन वाजून बावीस मिनिटांनी – रहस्य, रोमांच आणि रंगमंचाचा अद्भुत संगम

मराठी रंगभूमीवर रहस्याचा ठसा उमटवणाऱ्या नीरज शिरवईकर आणि विजय केंकरे या लेखक-दिग्दर्शक जोडीने पुन्हा एकदा रंगमंचावर उत्कंठा निर्माण करत ‘दोन वाजून बावीस मिनिटांनी’ या नाटकाद्वारे प्रेक्षकांना एक आगळा अनुभव दिला आहे. दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, मुंबई येथे रंगलेल्या शुभारंभाच्या प्रयोगाने प्रेक्षकांना थरार आणि कलात्मक सादरीकरणाचा मिलाफ अनुभवायला मिळाला. विशेष म्हणजे, या नाटकाचा पहिला प्रयोग महाराष्ट्राबाहेर, मध्य … Read more

‘श्श… घाबरायचं नाही’मध्ये विजय केंकरे यांचा नवा नाट्य प्रयोग

रत्नाकर मतकरी यांच्या लेखणीतून जन्मलेली रहस्यकथा आणि त्याला रंगभूमीवरील दृश्यरूप देणारा कल्पक, अनुभवी दिग्दर्शक म्हणजे विजय केंकरे. उत्कृष्ट लिखाण आणि दिग्दर्शनामुळे ‘श्श… घाबरायचं नाही’ नाटक सध्या चर्चेत आहे. बदाम राजा प्रॉडक्शन प्रस्तुत या सादरीकरणात ‘पावसातला पाहुणा’ आणि ‘जेवणावळ’ या मतकरींच्या दोन गूढ कथांचं एक नाट्यमय रूप प्रेक्षकांसमोर उभं राहणार आहे. विजय केंकरे या नाटकाचं दिग्दर्शन … Read more

रंगभूमीवर पुन्हा ‘सखाराम बाइंडर’

मराठीतील प्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकरांचे ‘सखाराम बाइंडर’ हे नाटक म्हणजे अभिजात कलाकृती. १९७२ साली प्रदर्शित झालेल्या या वास्तववादी नाटकाची जादू आजही पहायला मिळते म्हणूनच आजही या नाटकाला हात घालण्याची अनेक रंगकर्मीची इच्छा होते. विविध भाषांमध्ये याचे प्रयोग झालेच शिवाय, मराठी मध्येही नाटक वेगवेगळ्या संस्थांतर्फे पुनः पुन्हा लोकांसमोर सादर केले गेले. ‘सखाराम बाइंडर’ हे रंगभूमीवरचं एक … Read more

‘श्श… घाबरायचं नाही’: भीती, उत्कंठा आणि अंतर्मनाला भिडणारा अनुभव

मराठी साहित्यात आणि रंगभूमीत गूढकथांचा वेगळा आणि ठळक ठसा उमटवणाऱ्या रत्नाकर मतकरी यांच्या स्मृतीला रंगमंचावरून सन्मानित करण्यासाठी ‘बदाम राजा प्रॉडक्शन’ घेऊन येत आहे – ‘श्श… घाबरायचं नाही’. ही दोन अप्रतिम गूढ कथांची – ‘पावसातला पाहुणा’ आणि ‘जेवणावळ’ – नाट्यात्म प्रस्तुती आहे. दिग्दर्शनाची धुरा ज्येष्ठ रंगकर्मी विजय केंकरे यांनी सांभाळली आहे. त्यांच्या सशक्त दिग्दर्शनात या दोन … Read more

नाफा मराठी चित्रपट महोत्सव उत्सवी वातावरणात संपन्न!

सॅन होजे,(प्रतिनिधी) : संपूर्ण अमेरिका आणि कॅनडा मधील मराठी रसिकांच्या तुडुंब प्रतिसादामुळे ‘नाफा फिल्म फेस्टीव्हल २०२५ कमालीचा यशस्वी झाला. अडीच हजारांहून अधिक प्रेक्षक ‘द कॅलिफोर्निया थिएटर’ मध्ये या महोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी उपस्थित होते. तीन दिवसांच्या या महोत्सवामुळे मनोरंजनाची दिवाळी साजरी झाल्याची प्रतिक्रिया या महोत्सवाचे आयोजक, नाफाचे संस्थापक – अध्यक्ष अभिजीत घोलप यांनी व्यक्त केले. पहिल्या … Read more

‘मुंबई लोकल’ चित्रपटाचा प्रीमिअर दिमाखात संपन्न

मुंबई शहराच्या गतीला साथ देणारी लोकल ट्रेन ही केवळ प्रवासाचं साधन नसून, अनेकांच्या आयुष्याची साक्षीदार असते. याच लोकलमध्ये सुरू झालेल्या एका नजरेच्या क्षणात जन्माला आलेल्या प्रेमकथेचा सुरेख वेध घेणारा “मुंबई लोकल” हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. नुकताच या चित्रपटाचा प्रीमिअर शो मुंबईत जल्लोषात पार पडला. यावेळी चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या कलाकारांसोबत मराठी सिनेसृष्टीतील … Read more

रंगभूमीवरील परिपक्वतेचा आलेख – ‘भूमिका’

मराठी रंगभूमीची परंपरा म्हणजे भावभावनांच्या विविध छटांची मांडणी करणारी, समाजमनावर प्रभाव टाकणारी आणि प्रेक्षकांना अंतर्मुख करणारी एक समृद्ध सांस्कृतिक वारसा आहे. याच परंपरेला सन्मानपूर्वक पुढे नेण्याचं काम आजवर अनेक नाटकांनी केलं असून, आता त्यात आणखी एका दर्जेदार नाटकाची भर पडते आहे, ती म्हणजे ‘भूमिका’ या कलाकृतीची. विशेष म्हणजे हे नाटक केवळ एका नव्या कथानकाचं प्रतिनिधित्व … Read more

‘राणी’ उलगडणार स्त्रियांच्या स्वत्वाची नवी ओळख‘परिणती – बदल स्वतःसाठी’ मधील पहिले गाणे प्रदर्शित

दोन सशक्त आणि आत्मनिर्भर स्त्रियांच्या आयुष्याचा आणि त्यांच्या मैत्रीचा भावनिक प्रवास मांडणाऱ्या ‘परिणती – बदल स्वतःसाठी’ या चित्रपटातील पहिले गाणं ‘राणी’ नुकतंच रसिकांच्या भेटीला आलं असून, ते प्रेक्षकांच्या मनाला भिडताना दिसतंय. हे गाणं केवळ मैत्रीचं नसून स्त्रियांच्या स्वशोधाचा सुरेल आविष्कार आहे. सोनाली कुलकर्णी आणि अमृता सुभाष यांच्या जबरदस्त अभिनयामुळे आणि सशक्त स्क्रीन प्रेझेन्समुळे या गाण्याला … Read more