सांस्कृतिक मंत्री अ‍ॅड.  आशिष शेलार यांना ‘नाफा’ मराठी चित्रपट महोत्सवाचे विशेष निमंत्रण!

मराठी चित्रपटांना हॉलिवूडच्या झगमगाटात सन्मानाने सादर करणाऱ्या ‘नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन’ (नाफा) तर्फे आयोजित दुसऱ्या भव्य मराठी चित्रपट महोत्सवाला सॅनहोजे, कॅलिफोर्निया येथे २५ ते २७ जुलै २०२५ या कालावधीत रंगतदार सुरुवात होणार आहे. कॅलिफोर्निया थिएटर या प्रतिष्ठित स्थळी हा सोहळा आयोजित केला जाणार असून, यंदाचा महोत्सव अधिक भव्य आणि लक्षवेधी ठरणार आहे. ‘देऊळ’ आणि ‘भारतीय’ … Read more

सोनी BBC अर्थवर जुलैमध्ये सादर होणार हे थरारक कार्यक्रम

सोनी BBC अर्थ प्रेक्षकांना अभ्यासपूर्ण आणि साहसी जुलैचा आनंद घेण्यासाठी आवाहन करत आहे. या महिन्यात ‘इन्साइड द फॅक्टरी’ च्या सीझन 9 मध्ये दैनंदिन उत्पादनांच्या मागील अद्भुत प्रक्रिया कशा असतात हे प्रेक्षकांना बघायला मिळेल. ‘द मिसअॅडव्हेंचर्स ऑफ रोमेश रंगनाथन’ सह प्रेक्षक धमाल आणि डोळे उघडणाऱ्या जागतिक प्रवासाचा आनंद घेतील. ‘वॉन्डर विथ द बेस्ट’ या संकलनासह ही वाहिनी काही चित्तथरारक मोहिमांचा प्रवास सादर करणार आहे. ‘इन्साइड द फॅक्टरी’ चा सीझन 9 14 जुलै 2025 पासून सुरू होत आहे. यामध्ये युरोपच्या काही प्रचंड मोठ्या फॅक्टरीज आतून बघता येतील. तेथील इनोव्हेशन, कौशल्य आणि लोकप्रिय पदार्थ किंवा वस्तूंच्या मोठ्या प्रमाणातील उत्पादनासाठी लागणारी मशीनरी पाहता येईल. पॅडी मॅकगिनेस या नवीन सादरकर्त्यासोबत ही मालिका फॅक्टरी फ्लोरच्या पलीकडे जाते आणि इतिहासकार रूथ गुडमनसोबत उत्पादनांचे जबरदस्त मूळ आणि त्यांच्या मागील यशोगाथा शोधते. चेरी हीली चीज कर्ल्स, चॉकलेट सीशेल्स, फ्लॅपजॅक्स आणि हार्डबॅक पुस्तकांच्या मागच्या शास्त्राचा शोध घेताना दिसेल. गोष्टी कशा बनवल्या जातात यांचे छुपे विश्व आतून बघण्यासाठी हा नवीन सीझन प्रेक्षकांना आमंत्रित करत आहे. यानंतर, 28 जुलै 2025 रोजी ‘द मिसअॅडव्हेंचर्स ऑफ रोमेश रंगनाथन’चा प्रारंभ होत आहे. या मालिकेत कॉमेडीयन रोमेश रंगनाथन प्रेक्षकांना जगातील काही अनपेक्षित पर्यटन स्थानांवर घेऊन जाण्याचे धाडस करताना दिसेल. ही ठिकाणे आहेत, हैती, इथियोपिया, अल्बेनिया आणि आर्क्टिक. स्थानिक लोकांचे मार्गदर्शन घेत रोमेश तेथील उप-संस्कृती, विशिष्ट खाद्य पदार्थ यांचा शोध घेईल आणि जितकी म्हटली जातात तितकी ही स्थाने खरोखर आव्हानात्मक आहेत का, तेथील सौंदर्य आणि मोहकता चकित करणारी आहे का याचे उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करेल. कार्यक्रम हलक्याफुलक्या आणि विनोदी शैलीत सादर करण्यात आला आहे. हा कार्यक्रम प्रेक्षकांना अपारंपरिक प्रवासानुभवावर विचार करण्यास प्रेरित करतो. रोमेशच्या धाडसी कारनाम्यांसोबत सोनी BBC अर्थ 14 जुलै 2025 पासून ‘वॉन्डर विथ द बेस्ट’ हे सुंदर पर्यटनाचे एपिसोड असलेले खास संकलन देखील सादर करणार आहे. या विशिष्ट संकलनात प्रेक्षकांना विख्यात सादरकर्त्यांसोबत जगातील काही वैविध्यपूर्ण प्रदेश आणि संस्कृती यांचा शोध घेण्यास आमंत्रित करण्यात येत आहे. यामध्ये ज्या मोहिमांचा समावेश आहे, त्यामध्ये अॅलेक्झांडर आर्मस्ट्रॉंग सोबत केलेला आईसलँडचा प्रवास, जोआना लम्लीसोबत प्राचीन सिल्क रोडचा प्रवास, सू पर्किन्ससोबत गजबजलेल्या जपानचा प्रवास, दक्षिण कोरियाबाबत माहिती आणि सायमन रीव्हसोबत गंगा आणि श्रीलंकेचा अद्भुत प्रवास सामील आहे. या विशेष कार्यक्रमांमधून अप्रतिम दृश्य अनुभव मिळेल आणि कुशल शोधकांच्या दृष्टिकोनातून आपल्या ग्रहावरील सौंदर्य आणि विविधता साजरी होईल. त्यामुळे या जुलैमध्ये सोनी BBC अर्थ आवर्जून बघा. ‘वॉन्डर विथ द बेस्ट’ आणि ‘इन्साइड द फॅक्टरी’ हे कार्यक्रम 14 जुलैपासून अनुक्रमे रात्री 10:00 आणि रात्री 11:00 वाजता सादर होणार आहेत, तर ‘द मिसअॅडव्हेंचर्स ऑफ रोमेश रंगनाथन’ 28 जुलैपासून रात्री 10:00 वाजता सादर होणार आहे.

‘earth’ आणि ‘पिंची’ संस्थांचा स्तुत्य उपक्रम : वारीनंतर भक्ती-शक्ती चौकात स्वच्छता मोहीम

संत तुकाराम महाराजांची पालखी १८ जून रोजी देहूतून प्रस्थान करून १९ जून रोजी पिंपरीतील भक्ती-शक्ती चौकात आगमन करणार आहे. विठोबा माऊलीच्या दर्शनासाठी लाखो वारकरी भक्तिभावाने या पवित्र वारीत सहभागी होतात. मात्र, या भक्तिमय उत्सवाच्या समाप्तीनंतर मागे राहातो तो कचरा आणि अस्वच्छतेचा गंभीर प्रश्न. वारकऱ्यांच्या सेवेसाठी अनेक संस्था, नागरिक आणि हॉटेल्स अन्न-पाण्याची सेवा करत असले तरी … Read more

सलमान खान, महेश मांजरेकर यांच्या  उपस्थितीत ‘येरे येरे पैसा ३’च्या टायटल साँगचा धमाकेदार लाँच!

‘येरे येरे पैसा’ आणि ‘येरे येरे पैसा २’ या यशस्वी चित्रपटांनंतर आता प्रेक्षकांच्या मनोरंजनाची ट्रिपल डोस घेऊन ‘येरे येरे पैसा ३’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या बहुप्रतीक्षित चित्रपटाचे टायटल साँग नुकतेच एक भव्य सोहळ्यात लाँच करण्यात आले. विशेष म्हणजे या सोहळ्याला बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान आणि महेश मांजरेकर याची विशेष उपस्थिती होती, ज्यामुळे … Read more

‘जारण’चा नवा विक्रम! १२ दिवसांत कमावले ३.५ कोटीदुसऱ्या आठवड्यात विकेण्डला जमवला १.६५ कोटींचा गल्ला!

सध्या मराठी चित्रपटसृष्टीत ‘जारण’ चित्रपट प्रेक्षकांच्या मनात खास स्थान मिळवत आहे. दमदार अभिनय, हृदयाला भिडणारी कथा आणि उत्तम दिग्दर्शन यामुळे चित्रपटाने केवळ १२ दिवसांत तब्बल ३.५ कोटी रुपयांची कमाई करत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. विशेष म्हणजे, दुसऱ्या आठवड्यात केवळ विकेण्डला या चित्रपटाने तब्बल १.६५ कोटींचा गल्ला जमवला आहे, जो अलीकडच्या काळातील सर्वाधिक असल्याचे मानले … Read more

आई-मुलीच्या नात्याची सुंदर सादमायरा स्वप्नील जोशीचे मनोरंजन क्षेत्रात पदार्पण  अवधूत गुप्ते यांच्या ‘आई’ अल्बममधील ‘सांग आई’ गाणे प्रदर्शित

आई आणि मुलीचं नातं हे अतूट, भावनिक आणि नेहमीच थोडं वेगळं असतं. या नात्यात गोडवा असतो, तर कधी रुसवे-फुगवेही. मुलगी नेहमीच आपल्या आईचं  अनुकरण करत असते. तिचं वागणं  बोलणं, घराची काळजी घेणं आणि कधी आई घरी नसली तर तिच्या जागी आईसारखं वागण्याचा प्रयत्न करणं. हे सगळं एका सुरेल गाण्यातून उलगडलं आहे. ‘सांग आई’ हे अवधूत … Read more

मराठी सिनेसृष्टीला मिळाली नवीन जोडी !’आंबट शौकीन’मधील निखिल वैरागर – अक्षय टंकसाळे पुन्हा एकत्र

मराठी चित्रपटसृष्टीत सातत्याने नव्या संकल्पना, नव्या चेहऱ्यांना, नव्या जोडीला संधी मिळत असून प्रेक्षकही त्यांचं भरभरून स्वागत करत आहेत. आता अशाच नव्या आणि टॅलेंटेड जोडीचा प्रवेश मराठी सिनेमात होत आहे. ही जोडी म्हणजे निखिल वैरागर आणि अक्षय टंकसाळे. या दोघांचा ‘आंबट शौकीन’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, या चित्रपटाच्या निमित्ताने ही जोडी आपल्या नव्या दृष्टिकोनासह … Read more

गश्मीर महाजनीचा नवा अध्याय सुरू,वाढदिवसानिमित्त पहिल्या दिग्दर्शकीय चित्रपटाची घोषणा

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता गश्मीर महाजनी आता एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गश्मीरने चित्रपट, हिंदी मालिका, नृत्यामुळे प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे एक स्थान निर्माण केले आहे. आता गश्मीर लेखक-दिग्दर्शक आणि निर्मात्याच्या भूमिकेत पदार्पण करत आहे. विशेष म्हणजे, त्याच्या वाढदिवसानिमित्ताने त्याने त्याच्या या पहिल्या चित्रपटाच्या मुहूर्ताची सोशल मीडियावर घोषणा केली. जीआरम्स इव्हेंट्स अँड प्रॉडक्शन या … Read more

भाईंचा स्मृतिदिन ‘सुंदर’ होणार…!

‘जुने ते सोने’ या उक्तीचा प्रत्यय सध्या मराठी रंगभूमीवर येत आहे. काही नाट्यकलाकृती कितीही जुन्या झाल्या तरी पुनःपुन्हा बघाव्याशा वाटतात. कदाचित म्हणूनच, रंगभूमीवर या जुन्या नाट्यकलाकृतींची नव्याने नांदी होऊ घातली आहे. तेव्हाची अनेक नाटकं आज इतक्या वर्षानंतरही नाट्य रसिकांच्या आणि निर्माता-दिग्दर्शकांच्या मनावर गारुड करून आहेत. यातील काही नाटकांना पुनरुज्जीवित करण्याचे धाडस आजचे काही निर्माते करताना … Read more

‘आंबट शौकीन’ ललित, वरुण, रेड्डी येणार लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

कलाकारांची दमदार फौज असलेल्या धमाल चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित तीन अतरंगी मित्रांची भन्नाट कहाणी सांगणाऱ्या ‘आंबट शौकीन’चा धमाल ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलरमध्ये ललित, वरूण आणि रेड्डी हे तीन खट्याळ मित्र दिसत असून ते हसवण्यासोबत विचार करायलाही भाग पाडत आहेत. प्रेम, मैत्री, सोशल मीडियाच्या आभासी दुनियेत हरवलेली ओळख व मानसिक गुंतागुंत हे सगळे या चित्रपटात … Read more