‘नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन’चे मराठी ओटीटी विश्वात लवकरच होणार पदार्पण!

सॅन होजे (प्रतिनिधी) : ‘नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन’ अर्थात ‘नाफा’ (NAFA) या संस्थेची स्थापना २०२४ मध्ये अमेरिकास्थित उद्योजक, राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ‘देऊळ’ आणि ‘भारतीय’ या चित्रपटांचे निर्माते अभिजित घोलप यांच्या संकल्पनेतून झाली आहे. नाफाने २०२४ पासून ‘मराठी चित्रपट महोत्सवा’द्वारे आणि भारतात प्रदर्शित होणाऱ्या तारखेलाच नवे चित्रपट अमेरिकेत प्रदर्शित करून मराठी चित्रपटसृष्टीच्या कक्षा रुंदावल्या आहेत. कुठल्याही प्रकारचा … Read more

‘बोलविता धनी’: हृषिकेश जोशींच्या लेखणीतील नव्या नाटकासाठी क्षितीश दाते सज्ज!

मुंबई: प्रसिद्ध अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक हृषिकेश जोशी यांच्या आगामी ‘बोलविता धनी’ या नाटकाची सध्या नाट्यवर्तुळात जोरदार चर्चा आहे. प्रवीण भोसले, भरत नारायणदास ठक्कर, समृद्धी तांबे, गंधाली कुलकर्णी आणि सुनंदा काळुसकर यांची निर्मिती असलेल्या ‘बोलविता धनी’ या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन स्वतः हृषिकेश जोशी यांनी केले आहे. या नाटकात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारा अभिनेता क्षितीश दातेने … Read more

एन्काऊंटरचं गूढ, अत्तराच्या सुवासाचं ‘मॅजिक’

सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खानच्या हस्ते “मॅजिक” चित्रपटाचा ट्रेलर लाँच अभिनेता जितेंद्र जोशीची प्रमुख भूमिका असलेल्या मॅजिक या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. आता या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला असून, एन्काऊंटरचं गूढ, अत्तराच्या सुवासाचं ‘मॅजिक’ काय आहे, असा प्रश्न या गुंतवून ठेवणाऱ्या ट्रेलरनं निर्माण केला आहे. नुकताच सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खानच्या हस्ते या चित्रपटाचा ट्रेलर लाँच … Read more

सासू-सुनेची खट्याळ जुगलबंदी!

‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ शीर्षक गीत प्रदर्शित केदार शिंदे दिग्दर्शित आगामी मराठी चित्रपट ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ आपल्या हटके नावामुळे आणि धमाकेदार टीझरमुळे आधीपासूनच चर्चेत आहे. आता या चित्रपटाचे शीर्षक गीत प्रेक्षकांच्या भेटीला आले असून सासू-सुनेच्या नात्यातील टोमणे, नोकझोक, प्रेम आणि मस्तीची मजेशीर बाजू या गाण्यातून प्रभावीपणे मांडण्यात आली आहे. हे … Read more

हृषिकेश जोशी यांचा ‘बोलविता धनी’ नक्की आहे तरी कोण?

मुंबई: अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतलेले आणि लेखक-दिग्दर्शक म्हणूनही आपली वेगळी ओळख निर्माण केलेले अष्टपैलू कलाकार हृषिकेश जोशी हे रंगभूमीवर पुन्हा एकदा एका नव्या आणि अत्यंत रंजक विषयावर आधारित नाटक घेऊन येत आहेत. ‘अमरदीप + कल्पकला + सृजन थिएटर्स’ निर्मित, रसिकराज प्रकाशित आणि ‘सेरेंडिपिटी आर्ट्स’ च्या सौजन्याने साकारलेले हे नवे नाटक म्हणजे ‘बोलविता धनी’. नांदी … Read more

नाताळच्या सुट्टीत येतोय प्रथमेश परबचा गोट्या गँगस्टर

“गोट्या गँगस्टर” चित्रपटाचा अनोखा टीजर लाँच राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक दिवंगत राजेश पिंजानी यांचा अखेरचा चित्रपट ‘गोट्या गँगस्टर’ या चित्रपटाचा अनोखा टीजर लाँच करण्यात आला आहे. अवधूत गुप्ते यांच्या आवाजातील गोट्या भाय या गाण्यावरचा हा टीजर लक्षवेधी असून, नाताळच्या सुट्टीत २६ डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अन्नपूर्णा प्रॉडक्शन्स निर्मित गोट्या गँगस्टर या चित्रपटाची निर्मिती … Read more

शाळेच्या मैदानात परतले चित्रीकरणाचे दिवस

मराठी शाळांच्या अस्तित्वावर मनोरंजक पद्धतीने भाष्य करणाऱ्या बहुप्रतिक्षित ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच एका अनोख्या आणि भावनिक वातावरणात प्रदर्शित झाला. अलिबाग मधील नागाव येथील ज्या शाळेत या चित्रपटाचे चित्रीकरण झाले, त्याच शाळेच्या चौकात ट्रेलर अनावरणाचा सोहळा पार पडला.वर्गखोल्या, बाक, फळा आणि मैदान साक्षीदार असलेल्या या ठिकाणी कलाकार आणि उपस्थितांनी पुन्हा एकदा … Read more

रितेश देशमुखच्या उपस्थितीत ‘वडापाव’चा धमाकेदार ट्रेलर लाँच!

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या एकाच नावाची चर्चा रंगली आहे ती म्हणजे ‘वडापाव’! टिझर आल्यापासूनच या चित्रपटाने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली होती. त्यात आता प्रदर्शित झालेला धमाकेदार ट्रेलर त्या उत्सुकतेला आणखी हवा देतोय. नुकताच वडापाव’चा ट्रेलर लाँच सोहळा संपन्न झाला. या भव्य ट्रेलर लाँच सोहळ्याला महाराष्ट्राचा लाडका अभिनेता रितेश देशमुख यांची खास उपस्थिती होती. त्यांच्या उपस्थितीमुळे … Read more

नाशिकच्या कवींमुळे नेहा जोशीला सापडली ‘लक्ष्मी’

‘सखाराम बाईंडर’ पुन्हा रंगमंचावर! अभिनेत्री नेहा जोशी ‘लक्ष्मी’च्या भूमिकेत मुंबई: प्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकर लिखित आणि ५० वर्षांपूर्वी वादग्रस्त ठरलेले ‘सखाराम बाईंडर’ हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर येत आहे. या नाटकात अभिनेत्री नेहा जोशी ‘लक्ष्मी’ची अत्यंत महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारत आहे. या भूमिकेविषयी आणि नाटकाविषयी बोलताना तिने अनेक गोष्टी उघड केल्या. नेहा जोशीने सांगितले की, “सखाराम … Read more

‘मेगा क्लिन अप ड्राइव्ह’मध्ये वडापाव’ टीमचा सहभाग

आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिनाच्या (इंटरनॅशनल कोस्टल क्लिन अप डे) निमित्ताने मार्वे बीच येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘मेगा क्लिन अप ड्राइव्ह’ या उपक्रमात ‘वडापाव’च्या टीमने समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता केली. समुद्रकिनाऱ्यावरील कचरा साफ करून पाण्याचं प्रदूषण, सागरी जलसृष्टीचं रक्षण आणि लोकांमध्ये स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजिलेल्या या उपक्रमात दिग्दर्शक, अभिनेते प्रसाद ओक, गौरी नलावडे, रितिका श्रोत्री, शाल्व … Read more