महान गायक किशोर कुमार यांच्या खंडवा शहरातून आला आहे सितारे जमीन पर मधील सुनील गुप्ता उर्फ आशीष पेंढसे

‘तारे जमीन पर’ या २००७ मध्ये आलेल्या हृदयस्पर्शी चित्रपटाच्या आध्यात्मिक सिक्वेल ‘सितारे जमीन पर’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आल्यानंतर सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. या चित्रपटात हास्य, प्रेम आणि प्रेरणादायी गोष्टींचा सुंदर मिलाफ पाहायला मिळणार आहे. आता निर्मात्यांनी आणखी एका खास पात्राची ओळख करून दिली आहे — तो म्हणजे आशीष पेंढसे उर्फ सुनील गुप्ता. मध्य प्रदेशातील खंडवा … Read more

‘अमारिया’च्या भव्य प्रीमियर शोला सिनेसृष्टीतल्या नामांकित कलाकारांची उपस्थिती

आशिष शेलार, जॅकी श्रॉफ, सुभाष घईंच्या उपस्थितीत पार पडला प्रीमिअर शो ‘अमारिया’ या बहुप्रतिक्षित मराठी चित्रपटाचा भव्य प्रीमियर मोठ्या जल्लोषात पार पडला आणि त्याला उपस्थित राहिलेल्या मान्यवरांनी हा क्षण अविस्मरणीय ठरवला. आयटी आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीने या कार्यक्रमाला केवळ राजकीय नव्हे तर सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झालं. ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्या उपस्थितीने … Read more

विवाहितेच्या मनात दडलेलं गूढ, काळी जादू आणि जारणाचा विळखा

गूढ, रहस्य आणि भय यांची सरमिसळ असलेली एक कथा पुन्हा एकदा मराठी रुपेरी पडद्यावर उलगडण्याच्या तयारीत आहे. ‘जारण’ या चित्रपटाचा थरारक ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, तो पाहून प्रेक्षकांच्या अंगावर अक्षरशः काटा आला आहे. विवाहितेच्या आयुष्यात अचानक घडणारे सावल्यांचे खेळ, वाड्याच्या भिंतींमध्ये दडलेला काळोख आणि तिच्या भूतकाळाशी असलेलं नातं — हे सगळं काही प्रेक्षकांना एका … Read more

अनुराधा पौडवाल यांची नवी भक्तीमय स्वरभेट

लोकप्रिय पार्श्वगायिका पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांची नवी भक्तीमय स्वरभेट मुंबईतील श्री सिध्दीविनायकाच्या चरणी अर्पण! अवघ्या चार दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवाचे औचित्य साधून आदि शंकराचार्य रचित ‘गणेश पंचरत्न’ या गणपतीच्या श्लोक काव्याची स्वरभेट लोकप्रिय ज्येष्ठ पार्श्वगायिका पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांनी  कोट्यवधी भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या मुंबईतील श्री सिध्दीविनायक मंदिरात मंगळवारी सकाळी श्रींच्या चरणी अर्पण केली. श्री सिध्दीविनायक मंदिर … Read more

‘सूर्याची पिल्ले’ नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर 

सुनील बर्वे यांनी ‘हर्बेरियम’ उपक्रमांतर्गत काही अभिजात नाटकांचे २५ प्रयोग रंगभूमीवर सादर केले होते. त्यापैकीच एक वसंत कानेटकर लिखित ‘सूर्याची पिल्ले’ हे नाटक. या नाटकाच्या प्रत्येक प्रयोगाला ‘हाऊसफुल्ल’ची पाटी झळकली. इतके प्रेम नाट्यरसिकांनी या नाटकावर केले. याच प्रेमाखातर ‘सूर्याची पिल्ले’ हे तीन अंकी नाटक रंगभूमीवर येण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाले आहे. सुबक निर्मित नवनित प्रकाशित … Read more

१८ ॲाक्टोबरला उलगडणार ‘लाईक आणि सबस्क्राईब’चे रहस्य

काही दिवसांपासून सोशल मीडियावर ‘आपण शोधायचं का रोहित चौहानला?’ अशी पोस्ट व्हायरल होत होती. अनेकांना हा रोहित चौहान कोण असा प्रश्न पडला होता. तर आता हा रोहित चौहान कोण आहे, याचा १८ ॲाक्टोबरला लाईक आणि सबस्क्राईब’मधून उलगडा होणार असून या चित्रपटाचे एक नवीन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. पोस्टरमध्ये अमृता खानविलकर, जुई भागवत आणि अमेय … Read more

नवसंजीवनीचा संदेश देणारा ‘लाईफलाईन’

आधुनिक विज्ञान आणि परंपरा यांच्यातील संघर्ष दाखवणारा, ११ आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘लाईफलाईन’ चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून अवयवदानावर एका अनोख्या पद्धतीनं भाष्य करणारा हा चित्रपट प्रेक्षकांची वाहवा मिळवण्यात यशस्वी झाला आहे. प्रेक्षकांकडून, अनेक प्रख्यात डॉक्टरांकडून या चित्रपटाचे, दिग्दर्शकाचे कौतुक होत आहे. अवयवदानासारखा संवेदनशील विषय अतिशय उत्तमरित्या पडद्यावर मांडण्यात आले आहे. डॉक्टर आणि किरवंतामधील ही … Read more

‘लाईफलाईन’ मधील ‘होत्याचं नव्हतं झालं’ हे हृदयस्पर्शी गाणे प्रदर्शित 

क्रिसेंडो एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘लाईफलाईन’ या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रचंड लोकप्रियता मिळत आहे. डॉक्टरांचे आधुनिक विज्ञान आणि जुन्या परंपरेची मुळे यांच्यातील वैचारिक युद्ध या चित्रपटात पाहायला मिळणार असून ही चुरस रंगणार आहे अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर यांच्यामध्ये. त्यामुळे अशा दिग्गजांना एकत्र पाहाण्यासाठी प्रेषक खूपच उत्सुक आहेत. त्यातच आता या चित्रपटातील ‘होत्याचं नव्हतं झालं’ हे मनाच्या खोलवर … Read more

आपल्या हलदीन गर्दी करायला येतेयं ‘दादल्या’ 

मयूर शिंदे दिग्दर्शित ‘बाबू’ चित्रपटातील टायटल सॉन्ग आणि ‘फ्युचर बायको’ ही जबरदस्त गाणी प्रदर्शित झाल्यानंतर आता ‘दादल्या’ हे भन्नाट गाणे संगीतप्रेमींच्या भेटीला आले आहे. मंगेश कांगणे यांचे बोल असणाऱ्या या गाण्याला रोहन -रोहन यांचे उत्स्फूर्त संगीत लाभले आहे. तर चंदन कांबळे यांनी आपल्या दमदार आवाजात हे गाणे गायले आहे. अंकित मोहन आणि मंदार मांडवकर यांच्यावर … Read more

दिल्लीतील मराठी रसिकांसाठी २२ सप्टेंबरला कलगीतुरा नाटकाचे सादरीकरण

नवी दिल्लीतील इंडियन हॅबिटॅट सेंटरच्या राष्ट्रीय स्तरावरील आयएचसी नाट्य महोत्सवात नाशिकमधील लोकप्रिय ‘कलगीतुरा’ या संगीत नाटकाची निवड झाली आहे. हे नाटक २२ सप्टेंबर २०२४ रोजी, सायंकाळी ७ वाजता स्टेन ऑडिटोरियम येथे सादर होणार आहे. ‘कलगीतुरा’ हे नाटक मराठी लोककलेचा अप्रतिम नमुना असून, नाटककार दया पाटील यांनी या नाटकाचे लेखन दहा वर्षांच्या संशोधनातून साकारले आहे. या संगीत नाटकाचे दिग्दर्शन सध्याचे आघाडीच्या … Read more