रितेश देशमुखच्या उपस्थितीत ‘वडापाव’चा धमाकेदार ट्रेलर लाँच!

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या एकाच नावाची चर्चा रंगली आहे ती म्हणजे ‘वडापाव’! टिझर आल्यापासूनच या चित्रपटाने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली होती. त्यात आता प्रदर्शित झालेला धमाकेदार ट्रेलर त्या उत्सुकतेला आणखी हवा देतोय. नुकताच वडापाव’चा ट्रेलर लाँच सोहळा संपन्न झाला. या भव्य ट्रेलर लाँच सोहळ्याला महाराष्ट्राचा लाडका अभिनेता रितेश देशमुख यांची खास उपस्थिती होती. त्यांच्या उपस्थितीमुळे … Read more

नाशिकच्या कवींमुळे नेहा जोशीला सापडली ‘लक्ष्मी’

‘सखाराम बाईंडर’ पुन्हा रंगमंचावर! अभिनेत्री नेहा जोशी ‘लक्ष्मी’च्या भूमिकेत मुंबई: प्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकर लिखित आणि ५० वर्षांपूर्वी वादग्रस्त ठरलेले ‘सखाराम बाईंडर’ हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर येत आहे. या नाटकात अभिनेत्री नेहा जोशी ‘लक्ष्मी’ची अत्यंत महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारत आहे. या भूमिकेविषयी आणि नाटकाविषयी बोलताना तिने अनेक गोष्टी उघड केल्या. नेहा जोशीने सांगितले की, “सखाराम … Read more

‘मेगा क्लिन अप ड्राइव्ह’मध्ये वडापाव’ टीमचा सहभाग

आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिनाच्या (इंटरनॅशनल कोस्टल क्लिन अप डे) निमित्ताने मार्वे बीच येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘मेगा क्लिन अप ड्राइव्ह’ या उपक्रमात ‘वडापाव’च्या टीमने समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता केली. समुद्रकिनाऱ्यावरील कचरा साफ करून पाण्याचं प्रदूषण, सागरी जलसृष्टीचं रक्षण आणि लोकांमध्ये स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजिलेल्या या उपक्रमात दिग्दर्शक, अभिनेते प्रसाद ओक, गौरी नलावडे, रितिका श्रोत्री, शाल्व … Read more

बाप – मुलाच्या धमाल नात्याची झलक ‘आवशीचो घो’मध्ये!

‘दशावतार’मधील पहिलं गाणं प्रदर्शित सध्या सर्वत्र चर्चेत असलेला आणि प्रेक्षकांच्या प्रचंड उत्सुकतेचा विषय ठरलेला ‘दशावतार’ हा मराठी चित्रपट लवकरच म्हणजेच १२ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. झी स्टुडिओज प्रस्तुत, ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊस निर्मित या भव्य चित्रपटात अनेक दिग्गज कलाकारांची मांदियाळी आहे. दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, विजय केंकरे, सुनील तावडे, रवी … Read more

‘टँगो मल्हार’ या चित्रपटातून उलगडणार एका रिक्षा चालकाचा प्रेरणादायी प्रवास

चित्रपट या माध्यमाची जादू काही औरच आहे. कोणत्याही क्षेत्रात काम केलं, तरी स्वतः चित्रपट करण्याची उर्मी काहींना स्वस्थ बसू देत नाही. संगणक शास्त्रज्ञ तसेच उद्योजिका असलेल्या साया दाते यांनी आगामी ‘टँगो मल्हार’ या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केले आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आले असून येत्या १९ सप्टेंबरला हा चित्रपट संपूर्ण … Read more

दोन वाजून बावीस मिनिटांनी – रहस्य, रोमांच आणि रंगमंचाचा अद्भुत संगम

मराठी रंगभूमीवर रहस्याचा ठसा उमटवणाऱ्या नीरज शिरवईकर आणि विजय केंकरे या लेखक-दिग्दर्शक जोडीने पुन्हा एकदा रंगमंचावर उत्कंठा निर्माण करत ‘दोन वाजून बावीस मिनिटांनी’ या नाटकाद्वारे प्रेक्षकांना एक आगळा अनुभव दिला आहे. दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, मुंबई येथे रंगलेल्या शुभारंभाच्या प्रयोगाने प्रेक्षकांना थरार आणि कलात्मक सादरीकरणाचा मिलाफ अनुभवायला मिळाला. विशेष म्हणजे, या नाटकाचा पहिला प्रयोग महाराष्ट्राबाहेर, मध्य … Read more

‘श्श… घाबरायचं नाही’मध्ये विजय केंकरे यांचा नवा नाट्य प्रयोग

रत्नाकर मतकरी यांच्या लेखणीतून जन्मलेली रहस्यकथा आणि त्याला रंगभूमीवरील दृश्यरूप देणारा कल्पक, अनुभवी दिग्दर्शक म्हणजे विजय केंकरे. उत्कृष्ट लिखाण आणि दिग्दर्शनामुळे ‘श्श… घाबरायचं नाही’ नाटक सध्या चर्चेत आहे. बदाम राजा प्रॉडक्शन प्रस्तुत या सादरीकरणात ‘पावसातला पाहुणा’ आणि ‘जेवणावळ’ या मतकरींच्या दोन गूढ कथांचं एक नाट्यमय रूप प्रेक्षकांसमोर उभं राहणार आहे. विजय केंकरे या नाटकाचं दिग्दर्शन … Read more

रंगभूमीवर पुन्हा ‘सखाराम बाइंडर’

मराठीतील प्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकरांचे ‘सखाराम बाइंडर’ हे नाटक म्हणजे अभिजात कलाकृती. १९७२ साली प्रदर्शित झालेल्या या वास्तववादी नाटकाची जादू आजही पहायला मिळते म्हणूनच आजही या नाटकाला हात घालण्याची अनेक रंगकर्मीची इच्छा होते. विविध भाषांमध्ये याचे प्रयोग झालेच शिवाय, मराठी मध्येही नाटक वेगवेगळ्या संस्थांतर्फे पुनः पुन्हा लोकांसमोर सादर केले गेले. ‘सखाराम बाइंडर’ हे रंगभूमीवरचं एक … Read more

अभिनेता स्वप्निल जोशी याच्या विशेष उपस्थितीत रंगला “मुंबई लोकल” चित्रपटाचा ट्रेलर लाँच

मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकलच्या प्रवासात झालेल्या नजरानजरेपासून आयुष्य बदलणाऱ्या घटनेपर्यंतचा रंजक प्रवास “मुंबई लोकल” या चित्रपटातून उलगडणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सुप्रसिद्ध अभिनेता, निर्माता स्वप्निल जोशी यांच्या विशेष उपस्थितीत करण्यात आला.”मुंबई लोकल” या चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन अभिजीत यांनी केलं आहे. बिग ब्रेन प्रॉडक्शन्स, आनंदी एंटरटेनमेंट आणि स्प्लेंडिड प्रॉडक्शन्सने या चित्रपटाची निर्मिती केली असून … Read more

पुष्कर श्रोत्री सांगतोय ‘श्श… घाबरायचं नाही’ पण…

मराठी रंगभूमीचा प्रेक्षक हा केवळ मनोरंजनासाठी नाटक बघत नाही, तर त्याला वेगळं, काहीतरी आशयघन अनुभवायचं असतं असा ठाम विश्वास व्यक्त करत अभिनेता पुष्कर श्रोत्री आपल्या आगामी नाटकाबद्दल बोलत होता. ‘श्श… घाबरायचं नाही’ या नाट्यपूर्ण सादरीकरणात तो एक वेगळ्या शैलीतील, वेगळ्या स्वरुपातील अभिनय करताना दिसणार आहे. “मी काय वेगळं करू शकतो?” या विचारातून या सादरीकरणाची कल्पना … Read more